शासनाकडून विविध समाजातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. आता नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली असून 17 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. विना गॅरंटी कर्ज योजना लवकरच संपूर्ण देशभरामध्ये चालू होणार असून यामुळे बेरोजगारांना आता कर्ज मिळण्यास मदत होईल. ती योजना कोणती आहे ? पात्रता काय असेल ? कोणत्या समाजासाठी योजना लागू असेल ? इत्यादी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहूयात.

स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत विश्वकर्मा समाजातील कारागीर व शिल्पकार यांच्यासाठी नवीन योजना घोषित करण्यात आली. त्या योजनेचे नाव म्हणजे Vishwakarma Yojana in Marathi होय. सध्यास्थितीत अनेक तरुण त्यांच्याकडे कौशल्य असतानासुद्धा बेरोजगार असल्याचे दिसून येतात, हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून अशा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यात येत आहे.

PM विश्वकर्मा योजना महाराष्ट्र

त्यामुळे आता अशा तरुणांना विना गॅरंटी कर्ज शासनाकडून उद्योगासाठी, व्यवसायासाठी दिलं जाणार आहे. कारण कर्जाची प्रक्रिया म्हटली, की थोडी किचकट राहते आणि सहजासहजी बँकेकडूनसुद्धा कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही. आता या सर्वावर तोडगा म्हणून फक्त कामगार व शिल्पकारासाठी ही कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.

बिना गॅरंटी कर्ज | Loan Scheme 2023

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच तारण ठेवावं लागणार नाही. इतर कर्जाची प्रक्रिया पाहिली, तर आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी जमीन, सोने किंवा इतर वस्तू गहाण ठेवावी लागते; परंतु बेरोजगार तरुणांचा विचार करता या ठिकाणी तारण न ठेवता बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे, त्यामुळे अशा नवयुवकांना सदर योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.

 

या योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 13000 करोड ते 15000 हजार रुपये करोड इतका बजेट ठेवण्यात आलेला असून याअंतर्गत जवळपास 30 लाख नवयुकांना विश्वकर्मा योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे. देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त अवचित साधून सदर योजना सुरू करण्यात येणार आहे.

 

कागदपत्र कोणती लागतील ?

आधार कार्ड

पॅन कार्ड

मोबाईल क्रमांक

ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

जातीचा दाखला

बँक पासबुक